esakal | Solapur: स्मार्ट कार्डला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur Municipal Corporation

सोलापूर : स्मार्ट कार्डला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : महापालिका आरोग्य विभागात मलेरियाअंतर्गत कार्यरत असलेले कर्मचारी जीपीआरएस सिस्टिमशी जोडलेल्या वाय टॅग ॲपच्या माध्यमातून काम करत नसल्याने आणि वारंवार सूचना करूनही कर्मचाऱ्यांमध्ये बदल न झाल्याने आयुक्‍त पी. शिवंशंकर यांनी तब्बल ४१ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. गरजेनुसार कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करण्याची सूचना केली.

महापालिकेतील सर्वच विभागातील कामकाज हे ई-ऑफिस व जीपीआरएस प्रणालीतून करण्यासाठी आयुक्‍तांचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व कर्मचाऱ्यांनी ॲन्ड्रॉईड मोबाईल व संबंधित ॲप घेण्याची सूचना संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना आयुक्‍तांनी केली होती. या पध्दतीमुळे कर्मचाऱ्याच्या दिवसभराचा कामाचा अपडेट मिळते. सध्या डेंग्यूचा प्रादूर्भाव अधिक आहे. त्यासाठी मलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांकडून शहरातील घरे, पाणी कंटेनर सर्व्हे करणे, फॉगिंग करणे, धुराळणी करणे आदी जबाबदारी सोपविण्यात आली होती. प्रत्येक कर्मचाऱ्यांनी दिवसभरात केलेल्या कामाचा अपडेट या वाय टॅग ॲपवरून देण्याबाबत सूचना केली होती. त्यासाठी महिन्याभराची मुदतही देण्यात आली. ऑनलाइन कामाची नोंद घेतली जाईल, ऑफलाइन पद्धतीने केलेल्या कामाचे वेतन दिले

जाणार नाही, अशी भूमिका आयुक्‍तांनी घेतली. मात्र, कर्मचाऱ्यांनी ऑफलाइन कामकाज कायम ठेवल्याने आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी मलेरिया विभागातील ४१ कर्मचाऱ्यांना निलंबित केले.

कर्मचाऱ्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा अहवाल वाय टॅग ॲपद्वारे देणे अपेक्षित आहे. ही वाय टॅग ॲप जीपीआरएस प्रणालीशी निगडीत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्याचे दिवसभरातील काम आणि ठिकाण याबाबतची माहिती मिळते. मात्र, मलेरिया विभागातील कर्मचारी वाय टॅग ॲप डाउनलोड करीत नसल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यांच्या कारवाईमुळे कामकाजात विस्कळीतपणा येणार नाही. गरजेनुसार कंत्राटी पध्दतीने कर्मचारी भरण्यात येणार आहे.

- धनराज पांडे, उपायुक्‍त मनपा

loading image
go to top