सोलापूर : ग्रामीण भागात 43 ठिकाणी कोव्हीड केअर, हेल्थ हॉस्पिटल निश्‍चित 

corona
corona

सोलापूर : कोरोना विषाणूंच्या संसर्गाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सोलापूर जिल्ह्याकरिता कोव्हीड केअर सेंटर, डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटलसाठी विविध 43 ठिकाणे निश्‍चित केली आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटलसाठी सहा इमारती निश्‍चित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पंढरपुरातील तीन हॉस्पिटलचा समावेश आहे. कोव्हीड केअर सेंटर म्हणून पंचवीस आणि डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर म्हणून बारा हॉस्पिटल निश्‍चित करण्यात आली असून याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश काढला आहे. 

कोव्हीड केअर सेंटर इमारती आणि तेथील उपलब्ध बेड संख्या : श्री. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट (200), श्री. स्वामी समर्थ भक्त निवास, अक्कलकोट (239), श्री. साई आयुर्वेदिक महाविद्यालय, वैराग (550), यशवंतराव चव्हाण, महाविद्यालय, करमाळा (250), महात्मा गांधी विद्यालय, करमाळा (50),अण्णासाहेब जगताप विद्यालय, करमाळा (80), संकेत मंगल कार्यालय, माढा (150), रामानंद स्वामी मंगल कार्यालय, माढा (150). आदी लक्ष्मी मंगल कार्यालय, माढा (152), उपविभागीय अभियंता, भीमा कालवा निवासस्थान, मोहोळ (388), प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारत, महाळुंग, ता. माळशिरस (150), गुरुकृपा मंगल कार्यालय, तांबवे, ता. माळशिरस (100), आनंदी गणेश मंगल कार्यालय, आनंदनगर, ता. माळशिरस (120), अक्षता मंगल कार्यालय , माळशिरस (120), सगुण स्वामी मंगल कार्यालय, तांदूळवाडी, ता. माळशिरस (140), मधुमिलन मंगल कार्यालय, नातेपुते, ता. माळशिरस (100), मदनसिंह मोहिते-पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, मंगळवेढा (168), संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा (176), श्रीराम ग्रामीण संशोधन विकास प्रतिष्ठान होस्टेल नान्नज, ता. उत्तर सोलापूर (147), एमआयटी इन्स्टिट्यूट, पुणे रोड, पंढरपूर (300), स्वेरी इंजिनिअरिंग व फार्मसी कॉलेज, गोपाळपूर, पंढरपूर (317), सांगोला महाविद्यालय, कडलास रोड, सांगोला (165), प्राथमिक आरोग्य केंद्र, मेडशिंगी, ता. सांगोला (50), शिवाजी पॉलिटेक्‍निक कॉलेज, कडलास रोड, सांगोला (260) आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी, सोलापूर (338). 

बारा ठिकाणी हेल्थ सेंटर 
डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर म्हणून बारा हॉस्पिटल निश्‍चित करण्यात आली आहे. या हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्‍टर वैद्यकीय मनुष्यबळ आणि ऑक्‍सिजन पुरविणारी यंत्रणा आहे. हेल्थ सेंटरची नावे पुढील प्रमाणे, कंसात उपलब्ध बेड संख्या- सेंट ल्युक्‍स हॉस्पिटल नान्नज, ता. उत्तर सोलापूर (50), श्री. स्वामी समर्थ रुग्णालय, अक्कलकोट (200), साखरे हॉस्पिटल कुर्डुवाडी (59), देवडीकर मेडिकल सेंटर, अकलूज (25), कदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, अकलूज (50), संजीवनी हॉस्पिटल, एस.टी. स्टॅण्ड जवळ, मंगळवेढा (25), श्री. संत दामाजी मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल, मंगळवेढा (25), ग्रामीण रुग्णालय जेऊर, ता. करमाळा (50), दक्षता हॉस्पिटल, सांगोला (62), डॉ. सुनील लवटे हॉस्पिटल, सांगोला (30), डॉ. राजेश बाबर हॉस्पिटल, वाढेगाव नाका, सांगोला (33), श्री. विठ्ठल हॉस्पिटल, पंढरपूर (120). 
सहा ठिकाणी कोव्हिड हॉस्पिटल 
डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटल म्हणून सहा ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत. कोव्हिड हॉस्पिटलची नावे पुढील प्रमाणे, कंसात उपलब्ध बेड संख्या- अश्‍विनी रूरल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, कुंभारी (100), अकलूज क्रिटी केअर हॉस्पिटल , अकलूज (50), एसएसपी संचलित जगदाळे मामा हॉस्पिटल, बार्शी (300), जनकल्याण हॉस्पिटल, पंढरपूर (100), लाइफ लाइन हॉस्पिटल , पंढरपूर (108) आणि ऍपेक्‍स हॉस्पिटल, पंढरपूर (100).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com