Jail Road Police Crime Detection Team with the 35 recovered stolen motorcycles in Solapur.
Sakal
सोलापूर
Solapur Crime: चोरीच्या ३५ दुचाकी हस्तगत; आंतरजिल्हा चोरटा ताब्यात; जेलरोड पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई
Major Police Action in Solapur: ३१ ऑक्टोबर रोजी पोलिस कॉन्स्टेबल युवराज गायकवाड, उमेश सावंत यांना एकजण दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाली. त्यावरुन सीसीटीव्हीची पडताळणी केल्यावर तो दुचाकी विक्रीसाठी शनिवार पेठेतील हेवन टॉवरजवळ आल्याची खात्री झाली.
सोलापूर: सोलापूर शहरासह राज्याच्या वेगवेगळ्या शहरांतून दुचाकींची चोरी करणाऱ्या एका आंतरराज्य चोरट्यास पोलिसांनी पकडले आहे. त्याच्याकडून एकूण १० लाख ९८ हजारांच्या ३५ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. जेलरोड पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली आहे. शंकर भारत देवकुळे (रा. वैराग रोड, ता. धाराशिव, जि. धाराशिव) असे ताब्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव आहे.

