Solapur Crime News : सोलापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तीन महिलांची निर्घृण हत्या solapur crime news Three women found killed in mangalvedhe Solapur district know about shocking incidence | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur Crime News

Solapur Crime News : सोलापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तीन महिलांची निर्घृण हत्या

Solapur News: नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथे तीन महिलांचा सायंकाळी पाचच्या दरम्यान डोक्यात दगड घालून व हत्याराने वार करून खून करण्यात आला. एकाच घरातील तीन महिलांचा खून झाल्यामुळे नंदेश्वर गाव हादरून गेले आहे. तालुक्यात तिहेरी हत्याकांड होण्याची पहिलीच घटना आहे.

तालुक्याच्या दक्षिण भागातील नंदेश्वर ते मंगळवेढा रस्त्यापासून पूर्वेला एक किमी अंतरावर महादेव माळी यांची वस्ती आहे.

त्यांचा मुलगा बाळू माळी व जयश्री माळी हे दोघे दवाखान्यासाठी सांगोला येथे गेले होते. तर महादेव माळी यांचा हॉटेल व्यवसाय गावात असल्याने ते व दत्ता हे दोघे गावातील हॉटेलवर होते.

दुपारी पाचच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून दीपाली बाळू माळी (वय २५), संगीता महादेव माळी (वय ५०), पाराबाई बाबाजी माळी (वय ४५) या तीन महिलांचा राहत्या घरासमोर हत्याराने खून केला.

तिन्ही महिलांचे मृतदेह घरासमोर अत्यवस्थ अवस्थेत पडलेले होते. दुपारी चार वाजता बाळू व जयश्री सांगोल्यावरून परत आल्यानंतर घरासमोर तीन महिलांचा मृतदेह पाहताच हंबरडा फोडला.

या घटनेचे वृत्त समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक रणजित माने घटनास्थळी दाखल झाले असून हत्येच्या कारणामागील शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या तीन महिलांच्या खुनामुळे नंदेश्वर गावावर शोककळा पसरली असून अचानक

सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान झालेल्या तीन महिलांच्या खूनप्रकरणी शेजारील एका व्यक्तीस ताब्यात घेतले असून तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मंगळवेढा येथे पाठवण्यात आले आहेत.

- हिम्मतराव जाधव, अपर पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण.

टॅग्स :Solapurpolicecrime