
Shivsena News: ठाकरे गटाच्या याचिकेची सुनावणी स्वतंत्र बेंचसमोर; यापूर्वी काय घडलं?
Shivsena News: शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला द्यायच्या निर्णया विरोधात दाखल केलेल्या ठाकरे गटाच्या याचिकेवर आज दुपारी 3.30 वाजता सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे.
आयोगाविरोधात याचिका कोर्टाने ऐकू नये, त्यांना हायकोर्टानेही दोन वेळा नाकारले असा शिंदे गटाने दावा केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (Election Commission of India Eknath Shinde vs Uddhav Thackeray Dhanushyaban Shivsena )
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधातली ठाकरे गटाच्या याचिकेची सुनावणी स्वतंत्र बेंच समोर होणार आहे.
..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
सत्ता संघर्षाची सुनावणी ज्या पाच न्यायमूर्तींसमोर आहे त्या बेंचसमोर नव्हे तर सरन्यायाधीशांच्याच अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठ सुनावणी करणार आहे. आज दुपारी ठाकरे गटाच्या याचिकेवर दुपारी 3.30 वाजता सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे.

Shivsena News
आत्तापर्यंत काय काय घडलं?
ठाकरे गटाने केलेली याचिका मंगळवारी सूचिबद्ध झाली. त्यामुळे तातडीचा विषय म्हणून हे प्रकरण सुनावणीसाठी घेण्याची विनंती ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केली. त्यावर न्या. चंद्रचूड यांनी यावर आज, बुधवारी दुपारी साडेतीन वाजता सुनावणी घेण्याचे मान्य केले.
MPSC protest: शरद पवारांच्या भेटीनंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये फूट?
दुसरीकडे शिंदे गटानेही या मुद्द्यावर कॅव्हेट दाखल केले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंचे म्हणणे न्यायालय ऐकून घेणार आहे.
दरम्यान, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांचे अधिकार आणि शिंदे गटाच्या आमदारांविरुद्ध अपात्रतेची कारवाई सुरू करण्याबाबतची अध्यक्षांची भूमिका आदी मुद्द्यांवरील एक याचिकाही खंडपीठासमोर सुनावणीसाठी आहे.
दरम्यान, मंगळवारच्या सुनावणीवेळी सिब्बल यांनी शिवसेनेच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्याची प्रक्रिया शिवसेनेच्या नियमानुसार झाली नसल्याचा युक्तिवाद केला. 'विधीमंडळ पक्षनेता संबंधित पक्षातून निवडला जायला हवा.
Sanjay Raut : श्रीकांत शिंदेंनी जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपानंतर राऊतांच्या सुरक्षेत वाढ
त्यासाठी संबंधित पक्षाच्या अध्यक्षांनी विधानसभा अध्यक्षांच्या नावे पत्र द्यायला हवे. पण शिंदे यांच्याबाबत हे काहीच घडले नाही, तेव्हा कशाच्या आधारावर त्यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली? निवडणूक आयोगासमोरची याचिका पाहिल्यास १८ जुलैपर्यंत शिवसेनेच्या बैठकीसंदर्भात कोणताही उल्लेख नाही.
याचा अर्थ शिंदे यांच्याबाबतचे सगळे निर्णय पक्षाबाहेर घेतले जात होते, हे स्पष्ट दिसते', असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.