
Solapur News: दामाजीच्या कारखान्याच्या सभासंदाची चांगल्या प्रतीच्या साखरेची मागणी
मंगळवेढा : दामाजीच्या सभासंदाची चांगल्या प्रतीच्या साखरेची मागणी विचारात घेवून जिल्हयातील इतर कारखान्याच्या तुलनेत कमी दरात गुडीपाडव्यासाठी 25 किलो साखर 25 केंद्रातून उपलब्ध करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना अध्यक्ष पाटील म्हणाले की अवघे तीन लाख खात्यावर शिल्लक असताना 198 कोटी कर्जाचा डोंगर खांदयावर घेवून संचालक मंडळाच्या हातात कारखान्याचा कारभार सभासदांनी सोपवला हंगामाचे सुरुवातीला कारखान्याची सर्व बँकांची खाती थकीत असलेने विद्यमान संचालक मंडळाने स्वतःचे 7/12 उताय्रावर कर्ज काढून कारखाना सुरु केला.
तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक सभासद -शेतकरी, कर्मचारी, तोडणी वाहतुक ठेकेदार, हितचिंतक यांनी आमचे संचालक मंडळावर विश्वास ठेवून ऊस पुरवठा केलेने सर्वांच्या सहकार्याने कारखाना दिडपट क्षमतेने चालविला आहे। त्या विश्वासास पात्र राहून आजपर्यंत सभासदांची ऊस बिले, तोडणी ठेकेदारांची बिले, कामगार पगार या संचालक मंडळाने वेळेवर देण्याचा प्रयत्न केला.
कारखान्यासमोरील आर्थिक अडचणीचा विचार करुन कारखान्याचे कर्मचारीबंधुनीही आ8फ सिझनमधील कामकाजासाठी कर्मचारी व वेतन कपात करणेसाठी नेहमीप्रमाणेच सहकार्य करण्याचे ठरविले.
28 हजार सभासद पुर्वीचे होते नव्याने 10 सभासद वाढविले कारखाना सभासदांच्या मालकीचा राहिला पाहिजे, सभासद व कामगार सुरक्षीत राहिला पाहिजे या उद्देशाने सभासदांना सवलतीचे दराने दिली जाणारी साखर
यापुढे प्रति किलो रु।20/- या दराने दिपावली व पाडवा या सणाकरिता प्रती शेअर्स 25 किलो चांगल्या प्रतीची साखर देण्याचा निर्णय संचालक मंडळाचे दि.15 मार्च रोजी घेतला.
मागील वार्षिक सभेच्या प्रसंगी सभासदांनी साखरेचा दर वाढविला तरी चालेल परंतु चांगल्या प्रतीची साखर सभासदांना द्यावी अशी लेखी मागणी केली जिल्हयातील इतर कारखाने 25 ते 30 रु दराने देतात दामाजीने सभासदांना दिली जाणारी साखर कमी दराने म्हणजे
प्रति किलो 20 रू या सवलतीचे दराने दिवाळी व गुढीपाडव्याचे सणाला प्रत्येकी 25 किलो चांगल्या प्रतीची साखर देण्याचा निर्णय या संचालक मंडळाने घेतला कारखाना साईट,मंगळवेढा ऑफिस, खोमनाळ नाका, (राजकिरण चौक), ब्रम्हपूरी, माचणूर, बोराळे, सिध्दापूर,अरळी, डोणज ,नंदूर, मरवडे, हुलजंती, भोसे, रडडे शिरनांदगी, नंदेश्वर, हुन्नूर, लोणार, पाटखळ, शिरसी, आंधळगांव, मारापूर, सलगर बु, मारोळी,
निंबोणी,तळसंगी या केंद्रातून वाटप करण्यात येणार आहे यावेळी उपाध्यक्ष तानाजी खरात, संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणू पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील,गौडाप्पा बिराजदार,प्रकाश पाटील,दिगंबर भाकरे,महादेव लुगडे, सिध्देश्वर आवताडे,अशोक केदार, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, कार्यकारी संचालक सुनिल दळवी यांचेसह सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कामगार उपस्थित होते.