Solapur DCC Bank Loan : ओंकार साखर कारखाना ग्रुपला दिलेल्या कर्जाची चौकशी करावी अॅड. दिपक पवार यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत मागणी

₹887 Crore Loan to Omkar Sugar Group Under Scrutiny : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ओंकार साखर कारखाना समूहाला दिलेल्या ₹८८७ कोटींच्या कर्जावर सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित करण्यात आले.
Solapur DCC Bank Loan : ओंकार साखर कारखाना ग्रुपला दिलेल्या कर्जाची चौकशी करावी  अॅड. दिपक पवार यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत मागणी
Updated on

पंढरपूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने ओंकार साखर कारखाना ग्रुपला दिलेल्या 887 कोटींच्या कर्जावरुन बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार खडाजंगी झाली. जैनवाडी (ता.पंढरपूर) येथील वसुंधरा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष अॅड .दिपक पवार यांनी या मुद्दावर बॅंकेचे प्रशासक कुंदन भोळे यांना चांगलेच धारेवर धरले. बॅंकेने दिलेल्या या कर्जाची सखोल चौकशी करावी अशी मागणी अॅड. पवार यांनी केली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ही शेतकर्यांची बॅंक आहे. शेतकर्यांना विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या मार्फत कर्ज वाटप करताना वार्षिक 20 लाख रुपयांची कमाल मर्यादा घातली जाते. सर्वसामान्य शेतकर्यांना 20 लाखा साठी अनेक नियम आटी घातल्या जातात.

Solapur DCC Bank Loan : ओंकार साखर कारखाना ग्रुपला दिलेल्या कर्जाची चौकशी करावी  अॅड. दिपक पवार यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत मागणी
Maharashtra MLC Election 2026 : पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची तारीख ठरली; आजपासून आचारसंहिता लागू

मग बाहेरुन आलेल्या एका खाजगी ओंकार शुगर ग्रुपला तब्बल 887 कोटी रुपयांचे कर्ज कसे काय वाटप केले असा सवाल उपस्थित करत, यात काही तरी काळेबेरे असा आरोप अॅड. पवार यांनी केला आहे. भरसभेत पवार यांनी आरोप केल्यानंतर सभेत काही काळ गोंधळ झाला. त्यानंतर प्रशासक कुंदन भोळे यांनी सारवासारव करत कर्ज वाटपात काही त्रुटी किंवा नियमबाह्य बाब आढळल्यास त्यात तात्काळ दुरुस्ती करुन कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले.

Solapur DCC Bank Loan : ओंकार साखर कारखाना ग्रुपला दिलेल्या कर्जाची चौकशी करावी  अॅड. दिपक पवार यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत मागणी
IND vs JPN, Playing XI: जसप्रीत बुमराह संघाबाहेर, वैभव सूर्यवंशीला मिळाली का संधी? पावसामुळे किती ओव्हरची होणार मॅच?

यापूर्वी जिल्हा बॅंकेने अनेक साखर कारखान्यांना कोट्यावधी रुपयांची नियमबाह्य कर्जे वाटप केली आहेत. ती अजूनही थकीत आहेत. थकीत कर्जाचे प्रकरण गाजत असतानाच पुन्हा बॅंकेने एका खासगी साखर उद्योगाला कर्ज दिल्याचा मुद्दा पुढे आल्याने शेतकर्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Satara DCC Bank Election 2026 Ten Year Director Rule Brings Focus On Long Serving Directors And New Political Equations
Latur DCC Bank
Farmer Loan Waiver 2026
esakal
Marathi News Esakal
www.esakal.com