esakal | Solapur: अंत्यविधी केलेल्या मृताची 'रक्षा' चोरीस
sakal

बोलून बातमी शोधा

अंत्यविधी केलेल्या मृताची 'रक्षा' चोरीस
सोलापूर : अंत्यविधी केलेल्या मृताची 'रक्षा' चोरीस

सोलापूर : अंत्यविधी केलेल्या मृताची 'रक्षा' चोरीस

sakal_logo
By
अशपाक बागवान

बेगमपूर (सोलापूर) : अंत्यविधी केलेल्या मृताची स्मशानभूमीतील रिक्षा पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार बेगमपूर (ता.मोहोळ)येथे आज शुक्रवारी(ता.8) सकाळी उघडकीस आला. या प्रकारामुळे रक्षाविसर्जनासाठी आलेल्या नातेवाईकांसह ग्रामस्थांत तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे. अर्चना सिद्धेश्वर जगताप(वय35)असे मृत महिलेचे नाव आहे.

येथील वृत्तपत्र विक्रेते सिद्धेश्वर जनार्दन जगताप यांच्या पत्नी व राजू जगताप यांच्या त्या भावजय होत. याबाबत घटनेची महिती अशी अर्चना जगताप या आजारी असल्याने मागील महिन्याभरापासून सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या. दरम्यान बुधवारी सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

हेही वाचा: राज्यसेवेच्या जागा वाढल्याने विद्यार्थी खूश

रात्री उशिरा येथील भीमा नदी काठावरील स्मशानभूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले . आज शुक्रवारी तिसऱ्या दिवशीचा रक्षाविसर्जन विधी असल्याने नातेवाईकासह अनेक ग्रामस्थ स्मशानभूमीत आले असता मृत अर्चना यांचे ज्या जागेवर अंत्यसंस्कार झाले होते त्याठिकाणी केवळ मूठभरच रक्षा पहावयास मिळाली. तर कांही अंतरावर एका मोकळ्या खताच्या(युरिया) पोत्यात भरलेली परंतु अस्ताव्यस्त पसरलेली कांहीशी रक्षा व जळालेल्या अवस्थेत पडलेले पोते आढळून आले.

या घटनेमुळे जगताप कुटूंबियाना मोठा धक्का बसला. या अनपेक्षित प्रकारची उपस्थितामध्येही चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे मृताचे शवविच्छेदन केल्याने अंगावर सोने किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या मौल्यवान वस्तूही नव्हत्या. तरीही गावात प्रथमच घडलेल्या या अनपेक्षित प्रकारामुळे अनेक तर्क वितर्क केले जात असून काहींच्या मते निधनाच्या दिवशी पितृ अमावस्या असल्याने रक्षा पळवून नेण्याच्या प्रकाराबाबत वेगळी शंका व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: बेळगाव : 'रायण्णा' मालमत्ता अखेर ताब्यात

याशिवाय मागील महिन्यांत इंचगाव (ता.मोहोळ)येथे ही असाच प्रकार घडला असून गावातील दोन ते तीन केवळ मृत महिलांच्याच अंत्यविधीनंतर रक्षा पळविल्याचा प्रकार घडल्याचे इंचगाव येथील एका ग्रामस्थांने सांगितले. ग्रामीण भागातील या वाढत्या प्रकारामुळे संबंधित मृत कुटुंबियांच्या दुःखात अधिकच भर पडत असून समाजात चिंता व्यक्त केली जात आहे.

" निधनाच्या घटनेमुळे आम्ही अगोदरच दुःखी आहोत, त्यात रक्षाविसर्जनादिवशी घडलेला हा प्रकार माझ्या कुटुंबासाठी अत्यंत वेदनादायी आहे.

- सिद्धेश्वर जगताप (मृताचे पती)

गावात प्रथमच घडलेली ही घटना अत्यंत निंदनीय व संतापजनक आहे.याबाबत ग्रामस्थांच्यावतीने पोलीस चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याचे ऍड.गौरंग काकडे, तंटामुक्त अध्यक्ष आप्पासाहेब पाटील,दत्तात्रय चव्हाण,नवनाथ जगताप,बाळासाहेब जामदार, आदींनी सांगितले.या वर्षभरातच राजू जगताप यांच्या आई व भावजीचे ही अल्प आजाराने गावातच निधन झाले होते ,आता कुटूंबात ही तिसरी घटना घडली आहे.त्यात विसर्जनाच्या दिवशीच रक्षा पळविल्याने कुटूंबिना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

loading image
go to top