सोलापूर : आमचं ठरलयं पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करणार

पाण्याचा फवारा नको; कोरड्या रंगांचीच व्हावी मुक्त उधळण
Solapur Ranga panchami Updates
Solapur Ranga panchami Updatessakal

सोलापूर: ‘रंग बरसे भिगी चुनरीया रे रंग बरसे...’ असे न म्हणता ‘रंगरंगात रंग तू श्याम रंग..’ असे म्हणत कोरड्या नैसर्गिक रंगांची मुक्त उधळण करीत पर्यावरणपूरक व आरोग्यदायी रंगपंचमी उत्सव साजरा करूया. मानवी जीवनात आनंदाचे रंग भरण्यासाठी पर्यावरणपूरक उत्सव एकमेव उपाय आहे. आमचं ठरलयं, आम्ही कोरडी रंगपंचमी खेळणार असेच युवक सांगत आहेत. (Solapur Ranga panchami Updates)

महाविद्यालयीन तरुण तरुणींसह बच्चेकंपनीला रंगपंचमी म्हणजे एक आनंदाची पर्वणीच असते. त्याचबरोबर रंगपंचमी म्हंटलं की, डोळ्यासमोर विविध रासायनिक रंगांनी भरलेल्या पाण्याच्या बादल्या, ड्रम, हौद तसेच तोंडाला थ्रीडीमध्ये चमकविणारी रंगरंगोटी करून फिरणारे युवक असे चित्र उभे राहते. एका दिवसाच्या उत्सवामध्ये कळत- नकळतपणे वापरण्यात आलेल्या केमिकलयुक्त रंगांच्या वापराने, पाण्याचा फवारा करीत बेधुंदपणे नाचताना घडलेल्या अनेक दुर्घटनांमुळे अनेकांच्या आयुष्यातील आनंदाचे रंग नाहीसे झाले आहेत. ऐन उन्हाळ्यात दुष्काळाच्या झळा सोसताना होणारा पाण्याचा अपव्यय टाळून पर्यावरण वाचविण्यासाठी खारीचा वाटा उचलणे आवश्यक आहे. कोरड्या रंगांमुळे त्वचेची हानी होत नाही. अद्यापही कोरोनाचे सावट कायम असून, ओल्या रंगपंचमीमुळे उद्‌भवणारे आजार आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. पर्यावरणपूरक व आरोग्यदायी रंगपंचमी साजरी करण्यासाठी कोरडी रंगपंचमी हाच खरा उत्सव ठरू शकतो.

कोरोनाच्या सावटाखाली रंगपंचमी साजरी होत आहे. कोरडी रंगांची उधळण करून उत्सव साजरा झाला पाहिजे. तसेच स्वत:सह इतरांची सुरक्षितता अबाधित ठेवून रंगपंचमी सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी नैसर्गिक रंगाचा वापर व्हावा. आम्ही पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरा करतो, तुम्ही पण करा.

- रुपाली हुंडेकरी, युवती

वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची हानी थांबविणे ही सर्वांची जबाबदारी आहे. आज संस्कृती जपताना पर्यावरण प्रदूषित करण्याचे प्रमाण वाढले आहे. सण-उत्सवातून सकारात्मक आनंद, समाधान मिळविण्यासाठी आम्ही नैसर्गिक रंगांची कोरडी रंगपंचमी साजरी करण्यासाठी तयार आहोत, आपणही सुरुवात करा.

- महादेव हालोळ्ळी, युवक

रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक रंगांची कोरडी होळी हाच सणाचा मुख्य उद्देश झाला पाहिजे. हीच उत्सवाची संस्कृती बनली पाहिजे, यासाठी युवा पिढीने पुढे येण्याची गरज आहे. आमचं ठरलंय, पालेभाज्या, फळभाज्या आणि फुलांपासून तयार झालेल्या रंगांनीच रंगपंचमी साजरी करतो. तरुणाईने सण-उत्सवात सामाजिक व पर्यावरणाचे भान जपले पाहिजे.

- प्रवीण तळे, पर्यावरणप्रेमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com