
Solapur city development plan to be finalized by September; Municipal corporation maintains secrecy over committee report.
Sakal
सोलापूर: शहर विकासाच्या २०२३-४३ आराखड्याला अंतिम स्वरूप देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. २०१७ पासून प्रलंबित असलेला हा आराखडा अखेर अंतिम टप्प्यात पोचला आहे. आराखड्यातील ९२१ आरक्षणांवर शिक्कामोर्तब होणार की, नागरिकांच्या सूचना, आक्षेप व मागण्यांचा समावेश करून तो निश्चित करण्यात येणार आहे, याची स्पष्टता सप्टेंबर महिन्याअखेरपर्यंत होणार आहे.