

Solapur District Accident: One Fatality and Multiple Injuries in Travels–Pickup Crash
Sakal
सोलापूर : वैराग ते पाकणी या रोडने पिकअपमधून १३ जण जात होते. त्यावेळी सावळेश्वरजवळील पठाण बाबा दर्ग्याजवळ पिकअपला भरधाव ट्रॅव्हल्सने जोरात धडक दिली. त्यात तिघे बेशुद्ध तर दहाजण जखमी झाले होते. त्यातील वत्सला नारायण चवरे (वय ७०) या जखमी महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.