येस बॅंकेत अडकले 12 कोटी ! एनईएफटी, आरटीजीएससाठी पर्यायी व्यवस्था 

solapur-dcc-bank
solapur-dcc-bank
Updated on

सोलापूर : खातेदारांना आरटीजीएस, एनईएफटीची सेवा पुरविण्यासाठी सोलापूरसह राज्यातील 13 जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने येस बॅंकेकडून सबमेंबरशिप घेतली. मात्र, येस बॅंक अडचणीत सापडल्याने जिल्हा बॅंकांचे 370 कोटी रुपये त्या बॅंकेत अडकले आहेत. त्यात सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे 12 कोटी रुपये असून दोन महिन्यात पैसे मिळतील, असा विश्‍वास आहे. दरम्यान, खातेदारांच्या सोयीसाठी सोलापूर जिल्हा बॅंकेने आयसीआयसीआय बॅंकेकडून सबमेंबरशिप घेतली आहे. 

बॅंकांनी सबमेंबरशिप बदलली
देशातील 110 बॅंकांची सबमेंबरशिप असलेल्या येस बॅंकेद्वारे आरटीजीएस व एनईएफटीचे ऑनलाइन व्यवहार सुरु होते. त्यामध्ये विशेषत: महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्हा मध्यवर्ती बॅंका, नागरी व व्यापारी बॅंका, को-ऑपरेटिव्ह बॅंकांचा समावेश आहे. या बॅंकांनी ऑनलाइन सेवांसाठी येस बॅंकेकडे डिपॉझिट म्हणून जमा केलेली अनामत रक्‍कम आता बॅंक अडचणीत सापडल्याने अडकून पडली आहे. दरम्यान, येस बॅंक बंद पडल्यानंतर बहूतांश बॅंकांनी सबमेंबरशिप बदलली असून काही बॅंकांनी आयसीआयसीआय तर काही बॅंकांनी एचडीएफसी बॅंकांकडे धाव घेतली आहे. खातेदारांच्या सोयीसाठी त्यांनी तात्पुरत्या स्वरुपात सबमेंबरशिप बदलली आहे. तर रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशानुसार येस बॅंकेच्या माध्यमातून काही बॅंकांचे एनईएफटी, आरटीजीएस व चेक क्‍लेअरिंगचे काम सुरु करण्यात आल्याचे को-ऑपरेटिव्ह बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, कोल्हापूर बॅंकेचा रुपयाही येस बॅंकेत अडकला नसल्याचे बॅंकेचे अध्यक्ष तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. 


शहरातील दोन खासगी बॅंकांचा नकार 
येस बॅंकेत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे 49 टक्‍के शेअर आहेत. येस बॅंक अडचणीत सापडल्याने बॅंकेच्या खातेदारांची मोठी पंचाईत झाली आहे. देशातील 110 बॅंका येस बॅंकेच्या सबमेंबरशिपमध्ये आहेत. त्यामध्ये सोलापुरातील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसह अन्य तीन खासगी बॅंकांचाही समावेश आहे. मात्र, त्या दोन खासगी बॅंकांच्या व्यवस्थापनाने आमचा येस बॅंकेशी काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट केले. तर एका बॅंकेने पैसे अडकले नाहीत मात्र, आमच्या बॅंकेची एनईएफटी व आरटीजीएस सेवा येस बॅंकेमार्फत सुरु होती आणि आता सुरळीत सुरु असल्याचे स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MVA Unity Under Strain as Key Legislators Align with BJP in Council Election
Rajendra Raut Stresses Coordination Politics for Solapur’s Growth
Jaykumar Gore Says Mahayuti United, Open to Dialogue with Opposition
Female Patient in Men’s Ward Triggers Outrage; Health Authorities Face Criticism
Marathi News Esakal
www.esakal.com