

Solapur Bank Election Winners List
esakal
Solapur DCC Bank Election : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपप्रणित सहकार विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. बँकेच्या १९ पैकी १८ जागांवर या पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर माळशिरस विकास सोसायटी मतदारसंघातून अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी विजय मिळवत मोहिते-पाटील गटाचा गड राखला. भाजपप्रणित सहकार विकास पॅनलला मोहिते-पाटील यांच्या स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलने आव्हान दिले होते.