
Flood-hit farms in Solapur district; farmers await government compensation
Sakal
सोलापूर: अतिवृष्टी व महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील चार लाख ३९ हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या चार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत ६० टक्के बाधित क्षेत्राचे पंचनामे झाले असून कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील ८३७ गावांमधील शेतीचे नुकसान झाल्याची माहिती शासनाला कळविण्यात आली आहे. बाधितांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळणार आहे.