

Anger in Solapur district after a minor girl was assaulted in Tembhurni; police begin swift probe, citizens demand justice.
Sakal
टेंभुर्णी : एका अल्पवयीन मागासवर्गीय निर्भयावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्याचा व्हिडिओ काढून मारहाण, विनयभंग केल्या प्रकरणी पाच जणांविरोधात टेंभुर्णी पोलिस ठाण्यात पोक्सो व ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मे २०२५ ते ७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ही घटना घडली आहे.