esakal | दुसऱ्या गावाहून आला आहात तर, मग अशी भरा ऑनलाईन माहिती 
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur district invites you to submit your online information

सोलापूर जिल्हाधिकरी कार्यालय व जिल्हा प्रशासनामार्फत सर्वाना आवाहन करण्यात येते की, पुणे, मुंबई व इतर देशातून आलेल्या नागरिकांची (Self Reporting Report) माहिती ऑनलाईन भरण्यात येत आहे. ही माहिती स्वत: प्रवाशी किंव इतरही देऊ शकतात. फॉर्ममध्ये पुणे, मुंबई किंवा मागील 15 दिवसात बाहेरील देशातून आलेले प्रवशांची माहिती त्यांनी स्वतः हून भरावयची आहे. इतर नागरीक सुध्दा अशी माहिती देऊ शकतील.

दुसऱ्या गावाहून आला आहात तर, मग अशी भरा ऑनलाईन माहिती 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाने सध्या जगभर धुमाकुळ घातला आहे. भातात सध्या तो हातपाय पसरत आहे. त्याला रोखण्यासाठी सरकारने देश लॉकडाऊन केला आहे. महाराष्ट्रातही याचे रुग्ण दिवसांदिवस वाढत आसून सरकारने संचारबंदी लागु केली आहे. पुणे व मुंबईमध्ये रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. तेथील अनेक उद्योग, कंपन्या बंद आहेत. येथे कामाच्या शोधात ग्रामीण भागातून अनेक कामगार, नोकरदार गेले. पण, तेथीलच उद्योग बंद असल्याने उपासमारीची वेळ येऊ शकते. या भितीने आपापल्या गावाकडे म्हणजे खेड्याकडे स्थलांतर सुरु केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोना पसरण्याची शक्‍यता आहे. बाहेरुन आलेल्या प्रत्येक नागरिकांची माहिती जमा करण्याचे काम सध्या सरकारकडून सुरु आहे. ही माहिती आता ऑनलाईन सुद्धा देता येणार आहे. स्वत: किंवा इतरांन ही माहिती ऑनलाईन देता येणार आहे. ही माहिती भरण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeEici3ZKKgSGYcIRiVgMLrqxDfHWvOjbKcHEsN52XU0_w41A/viewform या लिंकवर क्‍लिक करा. समजुन घेण्यासाठी याच बातमीतील व्हिडीओ पहा. कशी माहिती भरायची जाणून घ्या... 

सोलापूर जिल्हाधिकरी कार्यालय व जिल्हा प्रशासनामार्फत सर्वाना आवाहन करण्यात येते की, पुणे, मुंबई व इतर देशातून आलेल्या नागरिकांची (Self Reporting Report) माहिती ऑनलाईन भरण्यात येत आहे. ही माहिती स्वत: प्रवाशी किंव इतरही देऊ शकतात. फॉर्ममध्ये पुणे, मुंबई किंवा मागील 15 दिवसात बाहेरील देशातून आलेले प्रवशांची माहिती त्यांनी स्वतः हून भरावयची आहे. इतर नागरीक सुध्दा अशी माहिती देऊ शकतील. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर आरोग्य विभागामार्फत सदरील व्यक्‍ती व त्यांचे कुटुंबीय यांची काळजी घेण्यात येईल. व्यक्‍तीचे माहिती द्यायची असेल तर त्या व्यक्‍तीचे कुटुंब प्रमुखाने नाव व संपर्क क्रमांक कळवावा. सदर माहिती गोपनीय ठेवण्यात येईल. सदर प्रवाशी आजारी असल्यास नजीकच्या शासकीय आरोग्य संस्थेत उपचार घ्या, अथवा जिल्हा कोरोना नियंत्रन कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 

अशी भरा माहिती... 
 


 • प्रवाशी व्यक्‍ती तालुका (तालुका निवडा) उत्तर सोलापूर 
  बार्शी 
  दक्षिण सोलापूर 
  अक्कलकोट 
  माढा 
  करमाळा 
  मंगळवेढा 
  सांगोला 
  पंढरपूर 
  मोहोळ 
  माळशिरस 
 • प्रवासी वास्तव्यास असलेल्या गावाचे नाव (कोठे राहत आहे त्याचे नाव) 
 • व्यक्‍ती हा सोलापूर जिल्हयातील आहे किंवा नाही? (दोन्हीपैकी एक निवडा) 

सोलापूर जिल्ह्यातील आहे 
इतर जिल्ह्यातील आहे 

 • प्रवाशी व्यक्‍तीचे नाव 
   
 • प्रवासाचा दिनांक 
 • मोबाईल नंबर 
 • प्रवाशी व्यक्‍तीचा पत्ता 

 • वास केला (दोन्हीपैकी एक निवडा) कोठून प्रभारतात 
  भारता बाहेरून' 
 • प्रवासाची पूर्ण माहिती 

 • क्तीला काही वैद्यकीय समस्या आहे का? सर्दी, ताप, खोकला इ. सारख्या व्य

होय 
नाही 
Other 

 • वैद्यकीय समस्येचा तपशील द्या 

आणि शेवटी सबमीट करा.