
सोलापूर : प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत खरीप पीकविम्यासाठी १४ दिवसांची मुदतवाढ देऊनही जिल्ह्यातून एकूण तीन लाख २९ हजार २५६ अर्ज आले आहेत. गतवर्षाच्या तुलनेत याची टक्केवारी केवळ ४४.६० इतकी आहे. राज्य सरकारने यंदा योजनेत केलेले बदल, प्रशासनाने अधिसूचित पिकांचा घातलेला घोळ आणि ॲग्रिस्टॅकचा अभाव यामुळे चार लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी पीकविमा भरणे टाळले आहे.