
सोलापूर: पोलिस भरतीसाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानंतर आता १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या काळातील रिक्तपदे भरली जाणार आहेत. भरतीची सुरुवात ऑक्टोबरपासून सुरु होणार असून नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मैदानी चाचण्या सुरु होतील. या पोलिस भरतीत सोलापूर शहराला अंदाजे ६०, सोलापूर ग्रामीण पोलिसांना ९० आणि राज्य राखीव पोलिस बल क्रमांक दहा यांना २५ ते ३०, असे एकूण सोलापूर जिल्ह्याला १८० नवे अंमलदार मिळणार आहेत.