MSRTC Summer Special Buses: उन्हाळी सुटीसाठी परिवहनकडून जादा गाड्या; सोलापूर विभागातून साठहून अधिक बस सोडण्याचे नियोजन
Extra Buses for Summer Vacation: संभाव्य गर्दी विचारात घेऊन एसटीने सोलापूर विभागाच्या सर्व आगारातून ६१ जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. यामुळे आता सुटीत प्रवास करणे सुकर होणार आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन जादा गाड्यांच्या नियोजन करण्यात आले आहे.
To accommodate the increased travel demand during summer holidays, over 60 additional buses will be deployed from Solapur division, ensuring smoother travel for passengers.Sakal
सोलापूर : एप्रिल महिन्यात मुलांच्या परीक्षा संपताच अनेकजण उन्हाळी सुटीसाठी फिरण्याचे नियोजन करतात. या पार्श्वभूमीवर एसटीने १६ एप्रिलपासून सोलापूर विभागाच्या सर्व आगारातून पन्नासहून अधिक जादा गाड्यांचे नियोजन केले आहे.