सोलापूर : आषाढी वारीमध्ये ‘ड्रोन’द्वारे छायाचित्रण करण्यास बंदी

जिल्हा प्रशासनाचे आदेश : भाविकांच्या सुरक्षेसाठी निर्णय
Ashadhi Wari Updates | आषाढी वारी
Ashadhi Wari Updates | आषाढी वारीsakal

सोलापूर : आषाढी यात्रा कालावधीत यंदा १२ ते १४ लाख भाविक येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था असून गोपनीय माहितीनुसार दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टेहळणी होऊन त्याचा अतिरेकी कारवायांमध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता असल्याने आषाढी वारीमध्ये ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण करण्यास बंदी घातल्याचे आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी शमा पवार यांनी जाहीर केले आहेत.

३० जून ते १३ जुलै या आषाढी वारी कालावधीत संत श्री ज्ञानेश्वर महाराज, संत श्री तुकाराम महाराज, संत श्री निवृत्तीनाथ महाराज, संत श्री सोपानदेव महाराज, संत श्री नामदेव महाराज, संत श्री एकनाथ महाराज, संत श्री मुक्ताबाई व संत श्री गजानन महाराज या मानाच्या पालख्या पायी चालत पंढरपूरच्या दिशेने येणार आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्र आणि इतर प्रांतांतून लाखो भाविक, वारकरी येतात. ९ जुलैला सर्व पालख्या पंढरपूर येथे एकत्र येतात. लाखो भाविक मंदिर परिसरात एकाच ठिकाणी एकत्र आलेले असतात.

या काळात नदी घाटावर, मंदिर परिसर, पालखी मार्गावर टीव्ही चॅनेल्स खासगी व्यक्ती, संस्थांकडून पालखी सोहळ्याचे छायाचित्रण होत असते. दहशतवादी घटनांचा विचार करता ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण करून त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वारीमध्ये जास्तीत जास्त भाविक ग्रामीण भागातील असल्याने त्यांना ड्रोनची कल्पना नसते. छायाचित्रण केले तर वारकऱ्यांमध्ये अफवा पसरून गोंधळ उडून चेंगराचेंगरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हा प्रशासनाने ३० जून ते १३ जुलैअखेर (पोलिस आयुक्तालय हद्द वगळून) पालखी सोहळ्याच्या संपूर्ण मार्गावर आणि पंढरपूर येथील आषाढी वारीमध्ये ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण करण्यावर बंदी घातली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com