
सोलापूर : गावातील भांडणांचे मूळ, कौटुंबिक कारणांमागील प्रमुख कारण दारू असल्याने जिल्ह्यातील अवैध हातभट्टी बंद व्हावी, म्हणून सप्टेंबर २०१९ पासून ग्रामीण पोलिसांनी ‘ऑपरेशन परिवर्तन’ हाती घेतले. दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने ‘हातभट्टीमुक्त गाव’ अभियान सुरू केले. मात्र, अवैध हातभट्ट्यांवर आणि गावागावातील विक्रेत्यांवर कारवाई करायची कोणी, याबाबतीत पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात हातभट्टीचा महापूर आला असून गावागावात खुलेआम अवैध हातभट्टीची विक्री सुरू आहे.