सोलापूर : नियमित पाणीपट्टी भरूनही घशाला कोरड

माजी महापाैर, सभागृह नेत्याच्या प्रभागातच नागरिकांची पाण्यासाठी भटकंती
water nal
water nalesakal

सोलापूर : सन १९९० च्या दशकात हद्दवाढ भाग महापालिकेत समाविष्ट झाला, पण अजूनही तेथील नागरिकांना ‘अच्छे दिन’ची प्रतिक्षाच आहे. पक्‍के रस्ते नाहीत, ड्रेनेज नाही, पिण्यासाठी नियमित व पुरेशा प्रमाणात पाणीही मिळत नाही. तरीही, त्याठिकाणच्या प्रत्येक कुटुंबाकडून वर्षाकाठी पावणेतीन ते पावणेसात हजारांची पाणीपट्टी घेतली जाते. मार्च संपण्यापूर्वीच सोलापूकरांच्या घशाला कोरड पडली आहे. माजी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी सभागृहनेते शिवानंद पाटील यांच्या भागात चार-पाच दिवसाआड पाणी येऊ लागले आहे.

महापालिकेच्या तिजोरीत दरवर्षी १७ कोटींची पाणीपट्टी जमा होते. पण, जलसंपदा विभागाला महापालिकेने नियमित पाणीपट्टी दिलेली नाही. वापरलेल्या पाण्याची जवळपास ५० कोटींची थकबाकी महापालिकेकडून येणे असल्याचे जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांकडून दरवर्षी पाणीपट्टी वसूल केली, पण ना जलसंपदा विभागाला पैसे दिले ना हद्दवाढ भागातील नागरिकांसाठी पिण्याची पाईपलाईन टाकली, अशी स्थिती आहे. २०१७ च्या निवडणुकीत सोलापुकरांना नियमित किंवा एकदिवसाआड पाणी देऊ म्हणून सत्तेवर विराजमान झालेल्या भाजप सत्ताधाऱ्यांना पूर्वीचा विस्कळीत पाणीपुरवठासुध्दा सुरळीत करता आला नाही, हे विशेष. चार वर्षांपूर्वी समांतर जलवाहिनीचे टेंडर काढले, पण चार वर्षांत केवळ १६ किलोमीटरपर्यंतच काम पूर्ण झाले.

आता सत्तेवरून पायउतार होताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारकडे बोट दाखवत राज्यातील सत्ता बदलल्यानेच समांतर जलवाहिनी वेळेत पूर्ण होऊ शकली नसल्याचा आरोप केला. वास्तविक पाहता पूर्वी दोन्ही देशमुखांच्या वादाची चर्चा होत होती, पण महापालिकेवर सत्ता आल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांमध्येच वादविवाद पहायला मिळाले. सर्वसामान्य नागरिकांचे सोडा, माजी महापौर व सभागृहनेत्यांच्याच परिसरात पाच-सहा दिवसातून एकदा पाणी येऊ लागले आहे.

शहरातील पाणीपट्टीचे स्वरूप

  • कूण नळ कनेक्‍शन : १,१३,०४२

  • प्रत्येक कुटुंबाची पाणीपट्टी : २,७५४

  • पाऊण इंच कनेक्‍शनसाठी : ६,८७६

  • बिगरघरगुतीसाठी पाणीपट्टी : ११,५५६ ते २३,११२

  • दरवर्षीची अपेक्षित पाणीपट्टी : १७.१९ कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com