सोलापूर : जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या चार लाख ४३ हजार २१ विद्यार्थ्यांचे अपार (ॲटोमेटेड पर्मनंट ॲकॅडेमिक रजिस्ट्री) आयडी कार्ड तयार करण्यात आले आहेत. त्याची टक्केवारी ५७.१२ असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. .Solapur Leopard News : सोलापूरपासून ८० कि.मी.च्या पट्ट्यात बिबट्या.नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘वन नेशन वन स्टुडंट’ आयडीच्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘अपार’ आयडी काढण्याचा निर्णय घेतला आहे..या आयडीमुळे विद्यार्थ्यांना एक विशेष क्रमांक मिळणार आहे. जिल्ह्यात त्याचे काम सुरू झाले असून, चार लाख ४३ हजार २१ विद्यार्थ्यांचे अपार आयडी कार्ड तयार झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण चार हजार ७१८ शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची संख्या सात लाख ७५ हजार आहे..जिल्ह्यात अपार आयडी तयार करण्याचे काम ५७.१२ टक्के झाले आहे. शाळांना विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून अपार आयडी तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वेळेत काम पूर्ण केले जाईल.- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर.Sangamner News : संगमनेरातील स्नेहसंवाद मेळावा ऊर्जा देणारा; विराट गर्दी, जिव्हाळा पाहून थोरात भारावले.तालुकानिहाय शाळा एकूण विद्यार्थी तयार आयडीसोलापूर शहर १ २१२ ७९१२२ ५२८००सोलापूर शहर २ १८० ६८३६२ ३५७२१माळशिरस ५४७ ७८९१५ ५२५८४सोलापूर उत्तर २८० ५८१५५ ३७३२७सांगोला ५०२ ६१४१७ ३६६८८माढा ४५७ ५७७५९ ३३४२३मोहोळ ३३८ ४९७५२ २८३०९पंढरपूर ५४८ ८२७२५ ४५९७९मंगळवेढा २७३ ३९४५६ २१४९०सोलापूर दक्षिण २८६ ४८३३८ २६३५४अक्कलकोट ३८१ ५१८८७ २७२५९करमाळा ३२५ ३७८३९ १८४८५बार्शी ३८९ ६१३९२ २६६०२एकूण ४७१८ ७७५६१९ ४४३०२१ .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.