सोलापूर : शेजारच्याकडून वीज कनेक्शन घेणे पडले महागात!

महावितरणकडून पोलिसांत फिर्याद; सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल
solapur
solapursakal

सोलापूर : येथील हनुमान नगरातील शिकलकर वस्तीत राहणाऱ्या बरबलसिंग लाखनसिंग दुधनी याच्याकडे विजेचे थकीत बिल असल्याने महावितरणकडून त्याचे कनेक्शन कायमचे बंद केले होते. तरीपण, त्याने शेजारच्याकडून वायर टाकून वीज घेतली. त्यामुळे महावितरणचे सहायक अभियंता गणेश कोळी यांनी बरबलसिंग याच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली.

दरम्यान, फिर्यादी कोळी हे त्यांचे सहकारी स्वप्नील शेप व समीश कोळी यांच्यासोबत वीजबिल वसुलीसाठी गेले होते. त्यावेळी कायमस्वरूपी वीजबिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांचाही ते शोध घेत होते. हनुमान नगरातील बरबलसिंग याच्याकडे नऊ हजार ६१० रुपयांची थकबाकी होती. तडजोडणीचे दोन हजार रुपयेही प्रलंबित होते. वारंवार मागणी करूनही त्याने वीजबिल भरले नाही. तरीपण, बरबलसिंग याने घराशेजारील महावितरणचे ग्राहक कलाकोर त्रिपालसिंग टाक यांच्या घरात काळ्या रंगाच्या इनकमिंग वायर टाकून अनधिकृतपणे वीज जोडणी करून घेतलेले त्यांना दिसून आले.

महावितरणचे सहायक अभियंता (वॉटर वर्क्स, उपविभाग ब, सोलापूर शहर) कोळी यांनी त्यासंदर्भात चौकशी केली. त्यावेळी बरबलसिंगने महावितरणचे वीजबिल न भरल्याने त्याचे कनेक्शन कायमचे बंद केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर कोळी यांनी थेट सदर बझार पोलिस ठाणे गाठले. बरबलसिंगविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलिस नाईक भोगशेट्टी तपास करीत आहेत.

शेजारच्यांकडून वीज घेणे गुन्हाच

स्वत:च्या मालकीचे घर असतानाही शेजारील व्यक्तीकडून अनधिकृतपणे वायर टाकून सबकनेक्शन घेणे कायद्याने गुन्हा आहे. धोकादायक पद्धतीने कनेक्शन घेता येणार नाही, असा महावितरणचा निकष आहे. पूर्वीचे वीजबिल थकीत ठेवून महावितरणला धोका देत अप्रामाणिकपणे व स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वीजचोरी केलेल्यांवर गुन्हे दाखल होतात, अशी माहिती अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी स्पष्ट केले. महावितरणने आता घरगुती व व्यावसायिक थकबाकीदार ग्राहकांचा शोध सुरू केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com