सोलापूर : एका दिवसात हटविली ६७ अतिक्रमणे

रेल्वेच्या जागेतील १३५० अतिक्रमणांवर पडणार हातोडा
 अतिक्रमण
अतिक्रमणsakal

सोलापूर : जुळे सोलापूर परिसरातील कल्याण नगर भाग एक ते तीन येथील रेल्वेच्या जागेतील तब्बल १३५० अतिक्रमणे रेल्वे प्रशासनाकडून काढण्यात येणार आहेत. यात पहिल्या टप्प्यात ५५० जणांना नोटीस देण्यात आली असून, पहिल्याच दिवशी कारवाई दरम्यान ६७ अतिक्रमण हटविण्यात आले आहेत. उर्वरित नोटीस दिलेल्या अतिक्रमणधारकांना दहा दिवसांची मुदत देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार कल्याण नगर भागात जवळपास २० वर्षापासून याठिकाणी वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना यापूर्वी रेल्वे आणि महापालिका प्रशासनाने अतिक्रमण काढून घ्यावे, असे सांगितले होते. मात्र त्यांनी अतिक्रमण काढले नसल्याने मार्च महिन्यात पुन्हा रेल्वेने नोटीस बजावली. काहींनी आपले अतिक्रमण स्वतःहून काढले तर कारवाईदरम्यान ६७ अतिक्रमणावर रेल्वेकडून कारवाई करण्यात आली. कल्याण नगर येथील रेल्वेच्या जागेवर अशा अनेक अवैध झोपड्यांकडे रेल्वे प्रशासनाने कित्येक वर्षापासून दुर्लक्ष केले होते. मागील चार ते पाच वर्षापूर्वी ही अतिक्रमणे हटविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आता रेल्वे प्रशासनाने कल्याण नगर भाग-१ ते ३ येथील राहणाऱ्या झोपडपट्टीवासीयांना दहा दिवसाच्या आत झोपडपट्टी हटविण्याचे आदेश दिले आहेत. कल्याण नगर ते मजरेवाडी यादरम्यान दुकाने, टपऱ्या, घरे कायम असून, यांना नोटीस देण्यात आली आहे. कारवाई दरम्यान रेल्वेचे अधिकारी, रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी उपस्थित होते.

लोकप्रतिनिधींना साकडे

मागील काही वर्षापासून अतिक्रमण काढले जाणार असे सांगितले जात होते. परंतु आता प्रत्‍यक्षात अतिक्रमण काढण्‍यास सुरूवात झाली आहे. त्‍यामुळे कल्याण नगर येथे राहणारी कुटुंबे चांगलीच हादरली आहेत. त्यांनी कारवाई होऊ नये म्हणून आमदार प्रणिती शिंदे व आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे धाव घेऊन त्‍यांना साकडे घातले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com