Solapur’s first-ever sack export worth ₹13 crore marks a new global opportunity.Sakal
सोलापूर
Solapur News:'सोलापुरातून प्रथमच सॅकची १३ कोटींची निर्यात'; भविष्यात चीनशी स्पर्धा अन् वाढती संधी; दहापेक्षा अधिक प्रकारची उत्पादने
First-Ever Sack Export from Solapur: सोलापुरातून पूर्वीपासून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये टेरीटॉवेल, साखर, शाफ्ट व बल्कड्रग्ज या गोष्टींचा समावेश आहे. या आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीच्या निर्यातीच्या आकडेवारीत पहिल्यांदाच प्लास्टिकयुक्त सॅक आणि बॅगचा समावेश झाला आहे.
सोलापूर: सोलापुरातून यंदा प्रथमच प्लास्टिकयुक्त पॅकिंग, सॅक अन् बॅगची निर्यात सुरू करण्यात आली आहे. या उत्पादनांच्या निर्यातीचा आकडा १३ कोटी ७९ लाखांवर पोचला आहे. भविष्यात या क्षेत्रातील संधी वाढण्याची चिन्हे आहेत.