
Sina River flood threat: Solapur district on high alert after heavy rains in Ahmednagar, Dharashiv, and Beed.
Sakal
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात पावसाने आज उघडीप घेतली. सीना-कोळेगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी रात्री व रविवारी झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका सोलापूर जिल्ह्यातील सीनाकाठाला आज बसण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यातील सीना नदीच्या महापुराच्या जखमा अजूनही ताज्या असताना उद्यापासून (ता. २९, सोमवार) सीना नदीला पुन्हा एकदा महापूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.