
Streets of Solapur resemble rivers after 32.6 mm rainfall; drainage choked for 3 days.
Sakal
सोलापूर: सोलापूर शहरात शनिवारी दुपारी तीन वाजता सुरू झालेल्या पावसाने सलग तिसऱ्या दिवशी दाणादाण उडविली. रस्त्यावरून नद्या वाहिल्यासारखे पाणी वाहत होते. तीन दिवसांपासून पाऊस असल्याने अनेक ठिकाणचे ड्रेनेजही तुंबले आहेत. सखल भागात गुडघ्यापर्यंत व काही ठिकाणी कमरेपर्यंत पाणी आल्याने वाहने बंद पडली. पाऊण तासांत ३२.६ मिमी पावसामुळे धावपळ उडाली. आडोशाला थांबण्यासाठी वाहन थांबवेपर्यंत चालक चिंब भिजले.