
Due to a power failure, Solapur city’s water supply has been delayed by a day, causing inconvenience to residents preparing for Diwali.
sakal
सोलापूऱ : सोरेगाव व पाकणी येथील जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा नऊ तास खंडित राहिल्याने पाणी उपसा होऊ शकला नाही. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा पुन्हा एकदा एक रोटेशनसाठी एक दिवसाने पुढे जाणार आहे. पुढील आठवड्याभरासाठी विस्कळित राहणार आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर पुन्हा पाणीपुरवठ्याचे नियोजन बिघडणार आहे.