
Homeless in Solapur during festive season; 2,619 panchanamas done but aid still pending.
Sakal
सोलापूर: सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे सणासुदीच्या काळात अनेकांचे संसार उघड्यावर पडले. घरातील साहित्य पाण्यात वाहून गेले. अतिवृष्टीने बाधित झालेल्या शहरातील २ हजार ६१९ घरांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तब्बल १५ दिवसानंतर या बाधित कुटुंबांना शासनाकडून दहा हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, मदतीची रक्कम हातात कधी येणार? याची प्रतीक्षा कायम आहे.