Solapur Farmer : मोहोळ तालुक्यातील 43 हजार शेतकऱ्यांची दिवाळी गोड.

पी एम किसान चे आठ कोटी 70 लाख रुपये प्राप्त"
Happy farmer
Happy farmeresakal

मोहोळ : सोमवार ता 17 रोजी "प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजने"चे मोहोळ तालुक्यातील 43 हजार 400 शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिपात्र शेतकरी दोन हजार रुपया प्रमाणे आठ कोटी 68 लाख रुपये विविध बँकात जमा झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. ऐन दिवाळीच्या अगोदर पैसे प्राप्त झाल्याने शेतकऱ्यां मधून आनंद व्यक्त केला जात आहे. दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या मोबाईलवर मेसेज खणखणू लागल्याने उत्सुकते पोटी शेतकऱ्यांनी ते पाहिले असता पैसे जमा झाल्याचे निदर्शनास आले.

सध्या शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. अतिवृष्टी, विविध पिकावर रोगांचा प्रादुर्भाव, शेतमालाला दर नसणे याचा त्या अडचणीत समावेश आहे. दिपवाळीच्या सणासाठी म्हणून तालुक्यातील साखर कारखान्यांनी त्यांच्या कुवती प्रमाणे ऊस बिलाचा हप्ता शेतकऱ्यांना देण्याचे जाहीर केले आहे.तसेच साखर वाटप ही सुरू केली आहे. या सर्व घडामोडी मुळे काही प्रमाणात का होईना शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यास मदत झाली आहे.

सध्या बाजारपेठेत गोडे तेलाचे भाव पुन्हा गगनाला भिडले आहेत. दिवाळीच्या सणात तेलाचा सर्रास वापर केला जातो, तसेच अन्य वस्तूंचेही भाव कमी नाहीत त्यामुळे हे पैसे किती पुरणार. मोहोळ तालुक्यात प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचे एकूण 50 हजार 150 शेतकरी आहेत. त्यापैकी तपासणीत 6 हजार 750 शेतकरी अपात्र झाले. एकूण 43 हजार 400 शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com