आधी लेखी, नंतर प्रात्यक्षिक! विद्यापीठाची 7 फेब्रुवारीपासून ऑनलाइन परीक्षा

परीक्षा
परीक्षा esakal

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सत्र परीक्षा 31 जानेवारीपासून सुरु करण्याचे नियोजित होते. परंतु, परीक्षा शुल्काचा पेच आणि ऑनलाइन परीक्षांमुळे वेळापत्रकात बदल करून आता 7 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु केली जाणार आहे.

परीक्षा
12 तासात 5 दहशतवाद्यांना कंठस्नान; सुरक्षा दलाला मोठं यश

हिवाळी सत्रातील ऑक्‍टोबर महिन्यात होणारी परीक्षा कोरोनामुळे लांबणीवर पडली. हिवाळी सत्र परीक्षा फेब्रुवारी 2022 मध्ये घेतली जाणार आहे. 7 फेब्रुवारीपासून सुरवातीला अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होईल. त्यानंतर फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून अन्य विद्याशाखांमधील विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु होईल. तत्पूर्वी, कोरोनाचा संसर्ग कमी झाला, तेव्हा काही पेपर ऑफलाइन तर काही ऑनलाइन होतील, असे विद्यापीठाने स्पष्ट केले होते. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पुन्हा त्यात बदल झाला आणि सर्वच विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय झाला.

परीक्षा
ऑनलाइन सभेदरम्यान नगरसेवकाकडून सिगारेटचे झुरके

31 जानेवारीपासून परीक्षा सुरु करण्याचे ठरले, परंतु परीक्षेचा अर्ज करण्यासाठी विद्यापीठाने 25 जानेवारीपर्यंत मुदत दिली. परीक्षा शुल्कात वाढ केल्याने काही विद्यार्थ्यांना अर्ज करता आले नाहीत. त्यामुळे परीक्षेचे वेळापत्रक बदलावे लागल्याचे विद्यापीठातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. परीक्षा शुल्कात वाढ करण्यासंबंधीचा निर्णय कोरोनामुळे मागील तीन वर्षांपासून प्रलंबित होता. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नसतानाही 10 टक्‍के शुल्कवाढ करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. सोमवारी (ता. 31) कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस या विद्यापीठात आल्यांनतर काय निर्णय घेतील, याची सर्वांना उत्सुकता आहे.

अगोदर लेखी अन्‌ शेवटी प्रात्यक्षिक

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत 110 महाविद्यालये आहेत. विद्यापीठातील विविध विद्याशाखा व संलग्नित महाविद्यालयांमधील एकूण 63 ते 68 हजार विद्यार्थी ही सत्र परीक्षा देणार आहेत. कोरोनाचा संसर्ग अजूनही कमी झाला नसल्याने काही विद्यार्थ्यांचे गट करून त्यांचे प्रात्यक्षिक घ्यावे, असे विद्यापीठाने महाविद्यालयांच्या प्राचार्यांना कळविले आहे. परंतु, लेखी परीक्षा आठ दिवसांवर असल्याने प्रात्यक्षिक उरकणे अशक्‍य आहे. त्यामुळे लेखी परीक्षा झाल्यानंतर प्रात्यक्षिक होईल, असेही विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com