Solapur : फॉलोअर्सच्या आभारासाठी ‘रील्स स्टार’चा चौकात फलक

सोलापूरच्या कलाकाराला कोट्यवधी प्रेक्षकांची दाद; रंगली चर्चा
solapur
solapursakal

सोलापूर - सध्या इन्स्टाग्राम नवीन ब्रँडच्या रूपात समोर येत आहे. इंस्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सोशल मीडियाच्या दमदार प्रभावामुळे ‘रील’ हिरोंचा सर्वत्र डंका आहे. एका रात्रीत ‘स्टार’ बनविण्याची किमया सोशल मीडियात आहे.

आज कानाकोपऱ्यातला ‘रील हिरो’ आपल्या युनिक कंटेटनं जगाला डोक्यावर घेतोय. याचाच प्रत्यय आज सोलापुरात आला आहे.सोलापुरातील एका रील्स स्टारने १० हजार फॉलोअर्स पूर्ण झाल्याने फॉलोवर्सचे आभार मानण्यासाठी चक्क भर चौकात बॅनर लावला आहे.

रील्स स्टार शिवा केंगार पाच ते सहा महिन्यात सोलापुरी लेझीम, विनोदाचे रील्स बनविले आहेत यामध्ये त्याला मिलीयन व्हिव आणि १० हजार फॉलोअर्स मिळाले आहेत. याचे यश म्हणून आपल्या फॉलोअर्सचे आभार मानन्यासाठी त्याने वडिलांनी मित्रांच्या साह्याने भर चौकात बॅनर लावले आहे. सर्वत्र या बॅनरची सध्या चर्चा सुरू आहे.

solapur
Chh. Sambhaji Nagar : लिचेडच्या घाण पाण्यामुळे पिके करपली

केंगार हा शहरातील क्रांतीनगर झोपडपट्टीत राहतो. तो सध्या संगमेश्वर येथे कला शाखेच्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे. वडील बांधकाम मिस्तरी म्हणून उदरनिर्वाह करतात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असताना त्याने हा छंद जोपासला आहे. यामध्ये त्याला चांगले यश मिळाले आहे. वाढते फॉलोअर्स व व्हिवजमुळे वेबसिरीजमध्ये काम करण्याची ऑफर केंगारला आली आहे.

solapur
Solapur : दोन बंदूक, पाच गोळ्यांसह तरुणाला पोलिसांकडून अटक

इंस्टाग्रामवर ६०० ते ८०० व्हिडिओ बनविले आहेत.सोलापुरी लेझीम, विनोदाचे रील्सला कोट्यावाधीचे प्रेक्षक मिळाले यामध्ये १० हजार फॉलोअर्स मिळाले. माझा एक व्हिडीओ अपलोड झाल्यावर १० हजार लोकांपर्यंत पोचणार आहे. याचा आनंद साजरा करण्यासाठी मित्रांनी माझा बॅनर लावला आहे. मला वेबसिरीज काम करण्याची ऑफर आली आहे.

solapur
Sangali News: नवऱ्याच्या सुट्टीसाठी पत्नीने डेपोतचं झोपून केले ठिय्या आंदोलन

शिवा केंगार, रील्स स्टारइंस्टाग्रामवर ६०० ते ८०० व्हिडिओ बनविले आहेत.सोलापुरी लेझीम, विनोदाचे रील्सला कोट्यावाधीचे प्रेक्षक मिळाले यामध्ये १० हजार फॉलोअर्स मिळाले. माझा एक व्हिडीओ अपलोड झाल्यावर १० हजार लोकांपर्यंत पोचणार आहे. याचा आनंद साजरा करण्यासाठी मित्रांनी माझा बॅनर लावला आहे. मला वेबसिरीज काम करण्याची ऑफर आली आहे.

शिवा केंगार, रील्स स्टार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com