Solapur Airlines
सोलापूर: होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू झाल्यापासून सोलापूर-मुंबई विमानसेवेची चर्चा सुरू आहे. पण मुंबई व पुणे विमानतळावर गैरसोयीचे स्लॉट (विमान उतरण्याची वेळ) मिळाल्याने विमानसेवा पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मुंबई विमानतळावर मंगळवार, बुधवार, शुक्रवार व शनिवार या चार दिवशी दुपारी २ वाजता तर पुणे विमानतळावर पहाटे २ वाजता विमान उतरण्यास परवानगी मिळाली आहे. ही वेळ सोलापूरकरांसाठी गैरसोयीची आहे. आता मुंबई व पुणे या दोन्ही विमानतळावरील स्लॉट बदलून देण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे करण्यात आली आहे.