
Summary
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
मंत्री जयकुमार गोरे व भरत गोगावले यांनी बार्शी तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली.
शेतकऱ्यांनी मंत्र्यांच्या ताफ्यास अडवत सरकारच्या तुटपुंज्या मदतीवर संताप व्यक्त केला.
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून मंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे सुर केले आहेत. दरम्यान सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री भरत गोगावले हे आज बार्शी तालुक्यातील अतिवृष्टीची पाहणी केली. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी भरत गोगावले यांचा ताफा अडवत सरकारच्या मदतीवर तिखट शब्दात नाराजी व्यक्त केली. तुटपुंजी मदत करुन शेतकऱ्यांची टिंगल लावलीय का असा सवाल करत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.