
Solapur Flood Alert Three Highways Shut Rail Traffic Hit Due to Rising Sina River Water
सोलापुरात सीना नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. सीना नदीला पहिल्यांदाच महापूर आला आहे. यामुळे सोलापूरमधून जाणारे तीन महामार्ग बंद झाले आहेत. तर रेल्वे वाहतुकीलासुद्धा फटका बसला आहे. सोलापूर पुणे, सोलापूर कोल्हापूर, सोलापूर विजापूर महामार्गावरील पुलांवर पाणी आलं आहे. सोलापूरसह मराठवाड्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागात आज मुख्यमंत्र्यांसह मंत्री पाहणी दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री सोलापूर आणि लातूर दौऱ्यावर तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. पंकजा मुंडे या जालना जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार आहेत.