
Minister Jayakumar Gore
माढा/ सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पुराची परिस्थिती गंभीर आहे. सतत पाऊस पडत असल्यामुळे पंचनामे करण्यासारखी परिस्थिती सध्या नाही. पंचनामे करायला गेलो तर शेतात पाणी आहे. सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना कशी मदत देता येईल याबाबत चर्चा करू, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.