
Flood-affected villages along the Sina River in Solapur; authorities monitor health and sanitation.
Sakal
माढा : माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या २० गावांना महापुराचा फटका बसला. १६ दिवसांपासून सीनाकाठचे ग्रामस्थ महापुराच्या संकटाशी संघर्ष करत आहेत. आता महापूर ओसरला आहे, महापुराचे पाणी ओसरले आहे. मात्र पूरग्रस्तांच्या डोळ्यातलं पाणी ओसरलेले नाही. पूरग्रस्तांसमोर आता अनेक समस्या, अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. संसाराचा गाडा पूर्वीप्रमाणे सुरळीत करण्यासाठी ग्रामस्थ निवाराकेंद्रातून आणि पै-पाहुण्यांच्या गावावरून आपल्या मूळ गावी परतत आहेत.