

Talathis in Solapur providing flood relief information digitally; citizens can now track aid details via mobile phones.
sakal
सोलापूर : जिल्ह्यातील सात लाख ६४ हजार १२७ शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीतील नुकसानीपोटी १५१९ कोटी रुपयांची मदत मंजूर झाली. परंतु, डीबीटी, फार्मर आयडी, ई-केवायसी अशा बाबींमुळे आतापर्यंत साडेतीन लाख शेतकऱ्यांना ४०९ कोटी रुपयांचीच भरपाई मिळाली आहे. राहिलेल्या शेतकऱ्यांना मदत का मिळाली नाही?, त्याचे मूळ कारण काय?, हे आता स्वत:च्या मोबाईलवर पाहता येणार आहे. प्रत्येक तहसील कार्यालयाने त्या याद्या तलाठ्यांच्या मोबाईलवर पाठविल्या आहेत.