Solapur Crime: साेलापूरात माजी नगरसेवक वाधवाणींवर हल्ला; २५ वर्षांपूर्वी पत्नीसोबत घटस्फोट, नातेवाइकानेच केले वार

25 Year Old Divorce Dispute Leads To Attack In Solapur: घटस्फोटाच्या जुन्या वादातून ८६ वर्षीय माजी नगरसेवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; नातेवाईक प्रकाश आडवाणी पोलिसांच्या ताब्यात
Solapur Crime

Solapur Crime

sakal

Updated on

सोलापूर : गुरूनानक चौकातील सिंधी कॉलनी येथे माजी नगरसेवक लालचंद वाधवाणी (वय ८६) यांच्यावर गुरुवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास त्यांच्याच भाचीच्या घटस्फोटित पतीने कोयत्याने वार केले. सिंधी कॉलनीत मृत व्यक्तीच्या तिसराचा कार्यक्रमात येऊन प्रकाश किसनदास आडवाणी (वय ६५) याने जीवघेणा हल्ला केला. सदर बझार पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com