
सोलापूर : नऊ दिवसांत कोरोनाचे वाढले अवघे चार रुग्ण
सोलापूर: शहरातील कोरोना आता हद्दपार होण्याच्या मार्गावर असून संपूर्ण शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहे. सध्या शहरात कोरोनाचे अवघे तीन रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे मागील नऊ दिवसांत (२५ मार्चपासून) शहरात कोरोनाचे अवघे चार रुग्ण वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील निर्बंध पूर्णपणे शिथिल व्हावेत म्हणून पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे पुढाकार घेणार का?, असा प्रश्न चित्रपटगृह मालक, क्रीडाप्रेमी, खेळाडू
हेही वाचा: Solapur : शिवसेना पराभूत! जिल्ह्यात राष्ट्रवादी अव्वल तर भाजपची आगेकुच
विचारू लागले आहेत.
शहरातील २६ प्रभागांपैकी बहुतेक प्रभाग कोरोनामुक्त झाले आहेत. मृत्यूदर असो वा रुग्णवाढीत सोलापूर शहर मागील दोन्ही लाटांमध्ये राज्यातील टॉपटेन शहरात होते. अनेक मंत्र्यांना सोलापूर शहराचा आवर्जुन दौरा करावा लागला होता. केंद्रीय पथकालाही सोलापूर शहरात यावे लागले होते. तिसऱ्या लाटेत शहरात दिलासादायक स्थिती राहिली. सात लाखांपैकी जवळपास सव्वासहा लाख व्यक्तींनी कोरोनावरील प्रतिबंधित लसीचा पहिला डोस
घेतला आहे. १५ ते १८ वयोगटातील १७ हजार तर १८ वर्षांवरील ५८ हजार व्यक्तींनी अजूनपर्यंत एकही डोस घेतलेला नाही. दुसरीकडे कोवॅक्सिनचा पहिला डोस घेऊन २८ दिवस तर कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेल्यांपैकी बहुतेक लोक दुसरा डोस घ्यायला येत नसल्याचीही शहरात स्थिती आहे.
हेही वाचा: Solapur: शाळांचे आरक्षण बदलण्याचा महापालिकेचा दुर्दैवी घाट
ग्रामीणमध्ये कोरोनाचे ५४ रुग्ण
सोलापूर शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर असतानाच ग्रामीणमधील संसर्गदेखील कमी झाला आहे. शनिवारी (ता.५) ग्रामीणमध्ये चार रुग्णांची भर पडली असून एकूण सक्रिय रुग्ण आता ५४ राहिले आहेत. त्यातील बहुतेक रुग्णांमध्ये कोरोनाची तीव्र लक्षणे नाहीत. तरीही, जवळपास चार लाख व्यक्तींनी अजूनही प्रतिबंधित लसीचा एकही डोस घेतलेला नाही. लस शिल्लक असतानाही नागरिक पुढे येत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील सगळे निर्बंध शिथिल होऊ शकलेले नाहीत. मात्र, लस न टोचलेल्यांमुळे इतरांना वेठीस धरणे योग्य आहे का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
Web Title: Solapur Four Days Number Corona Increased Only Patients
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..