पंढरपूर : इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे आंदोलन

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पंढरपुरात टांगा मोर्चा काढून मोदी सरकारचा निषेध केला.
राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे आंदोलन
राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे आंदोलनsakal

पंढरपूर (सोलापूर) : देशभरात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. या विरोधात राष्ट्रवादी युवक काॅग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. पेट्रोल,डिझेल आणि गॅस दरवाढी विरोधात मंगळवारी (ता.20) राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पंढरपुरात टांगा मोर्चा काढून मोदी सरकारचा निषेध केला. मागील काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ सुरुच आहे. वाढत्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना जगणं मुश्कील झाले आहे.

त्यातच गॅसच्या दरात मोठी वाढ झाल्याने गोरगरीबांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. मोदी सरकारने इंधनाचे दर कमी करावेत या मागणीसाठी पंढरपूर शहर राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील जगताप यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यावर केंद्र सरकारच्या विरोधात टांगा मोर्चा काढण्यात आला. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला. शेकडो कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर धडक मारली. यावेळी कार्यकर्त्यांनी टांगण्यामध्ये मोटारसायकल ठेवून इंधन दरवाढीचा निषेध केला.

राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे आंदोलन
पुणे : कोजागिरीच्या रात्री काँग्रेसमध्ये धूळवड

मोर्चा दरम्यान कार्यकर्त्यांनी शेतकरी विरोधी धोरणांचा व वाढत्या महागाई विरोधात भाजपवर हल्लाबोल केला. मोदी सरकारने इंधन दरवाढ करुन सर्वसामान्य लोकांची आर्थिक लुट केली आहे. या लुटारू सरकारला जनता धडा शिकवेल. येत्या काळात केंद्र सरकारने इंधन दरवाढ कमी करावी, अन्यथा मोदी सरकार विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेश सरचिव श्रीकांत शिंदे यांनी दिला.

मोर्चामध्ये राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील,शहर अध्यक्ष स्वप्नील जगताप,जिल्हा उपाध्यक्ष बापू शिंदे, तालुका अध्यक्ष संतोष चव्हाण, विश्वजीत व्यवहारे, यश महिंगडे, विशाल सावंत, मंगेश जाधव, शाम पवार, संजय मुळे, संतोष बंडगर, प्रशांत नलवडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी निवासी नायब तहसीलदार श्रोत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com