सोलापूर : गावडी दारफळच्या ओढ्याचे होणार खोलीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओढ्याचे होणार खोलीकरण

सोलापूर : गावडी दारफळच्या ओढ्याचे होणार खोलीकरण

सोलापूर: गावडी दारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथे सकाळ रिलिफ फंडाच्या माध्यमातून व देसाई ब्रदर्स लिमिटेडच्या सहकार्यातून ओढा खोलीकरण कामाची सुरवात शुक्रवारी (ता. १३) सकाळी नऊ वाजता केली जाणार आहे. या कार्यक्रमास उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, तहसीलदार जयवंत पाटील, गटविकास अधिकारी डॉ. जस्मिन शेख, पोलिस निरीक्षक अरुण फुगे, उपसरपंच जगन्नाथ पवार, माजी सरपंच राजेंद्र पवार, केशव माने, पांडूरंग पवार, सतीश सुर्वे, दीपक माळी, श्रीधर कदम, चांगदेव थिटे, दादा पाटील, देविदास पवार, हनुमंत पाटील, नामदेव पवार, रवींद्र पवार, धनाजी पवार, महादेव चौरे, नानासाहेब पवार उपस्थित राहणार आहेत.

गावडी दारफळ येथील नागरिकांच्या मागणीवरुन सकाळ रिलिफ फंडातून ओढा खोलीकरणाचे काम केले जाणार आहे. यासाठी देसाई ब्रदर्स लिमिटेडचे सहकार्य मिळाले आहे. गावडी दारफळ येथील वांगीरा ओढ्यावर कदम-भंडारे बंधाऱ्याजवळ हे काम केले जाणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच बालिका लोंढे यांनी केले आहे.