सोलापूर : हुतात्मा, सिद्धेश्वरसह ११० गाड्यांसाठी मिळणार जनरल तिकिटे

प्रवाशांची सोय; २९ जूनपासून तिकीट विक्रीस प्रारंभ
Rail
Rail sakal

सोलापूर : आरक्षण नसलेल्या व अचानक प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेने मोठा दिलासा मिळाला आहे. आता प्रवाशांना जनरल तिकिटावरही प्रवास करता येणार आहे. २९ जूनपासून सोलापूर विभागातून धावणाऱ्या तब्बल ११० रेल्वे गाड्यांमध्ये जनरल तिकीट विक्रीस प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.

मार्च २०२० मध्ये कोरोना काळात रेल्वे प्रशासनाने जनरल तिकीट बंद केले होते. केवळ आरक्षित तिकिटावर प्रवास करावा लागत असल्याने प्रवाशांच्या खिशावर आर्थिक भार देखील पडला. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने रेल्वेची सेवादेखील बंद केली. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरताच रेल्वे प्रशासनाने आरक्षित तिकिटावर रेल्वेची सेवा पुन्हा सुरू केली. सद्य:स्थितीत केवळ पॅसेंजर आणि मोजक्याच एक्स्प्रेस गाड्यांमध्ये जनरल तिकीट मिळत असून, येत्या २९ जूनपासून पॅसेंजरसह मेल, एक्स्प्रेस गाड्यांमध्ये देखील जनरल तिकिटावर प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.

दोन वर्षांपासून बंद होती जनरल तिकीट विक्री

सध्या सुरू असलेल्या मोजक्याच रेल्वे गाड्यांमध्ये जनरल तिकिटांची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक फटका सहन करावा लागतो. रेल्वे प्रशासनाने जनरल तिकिटांची विक्री मार्च २०२० पासून बंद केली होती. सोलापूर विभागातून धावणाऱ्या मेल, एक्स्प्रेस गाड्यांमध्ये आता जनरल तिकीट विक्री सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे अचानक प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय झाली आहे.

रेल्वे प्रशासनाने सोलापूर विभागातून धावणाऱ्या मेल-एक्सप्रेस गाड्यांमध्ये जनरल तिकिटाची विक्री उपलब्ध करून दिल्याने प्रवाशांना याचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांची गैरसोय देखील दूर होणार आहे.

- संजय पाटील,अध्यक्ष, प्रवासी सेवा संघ, सोलापूर

सोलापूर विभागातून धावणाऱ्या जवळपास ११० गाड्यांमधून २९ जूनपासून जनरल तिकिटावर प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. त्याची विभागाकडून तयारी करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.

- प्रदीप हिरडे,वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com