

Ajit Pawar Remembered with Respect; Solapur Pays Emotional All-Party Tribute
Sakal
सोलापूर : सर्वत्र गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या फुलांची सजावट, पार्श्वभूमीवर दादांच्या हसऱ्या चेहऱ्याची छबी आणि ‘आपला माणूस, महाराष्ट्राचा दादा’ अशी मोजकीच अक्षरे. व्यासपीठावर पांढरा शुभ्र गालिचा. गुलाब पुष्पहारामागे स्मितहास्य करणारी अजितदादांची प्रतिमा. दरवळणाऱ्या अगरबत्त्यांच्या धुराबरोबर अत्यंत भावुक होत सर्वपक्षीय नेत्यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.