Solapur News: 'सोलापूरकरांकडून विश्वविजेत्या गंगाचे जंगी स्वागत'; जागतिक अंधाची क्रिकेट स्पर्धा भारताच्या संघाने जिंकली !

Blind cricket World Cup: स्थानिक जनप्रतिनिधींनी गंगाचे अभिनंदन करत तिच्या खेळातील चिकाटी, मेहनत आणि जिद्दीचे कौतुक केले. दिव्यांग असूनही जागतिक क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवणारी गंगा आज हजारो युवकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरली आहे. तिच्या स्वागतसोहळ्यामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण होते.
World champion Ganga receives a grand and emotional welcome from Solapur citizens after India’s Blind Cricket World Cup victory.

World champion Ganga receives a grand and emotional welcome from Solapur citizens after India’s Blind Cricket World Cup victory.

Sakal

Updated on

सोलापूर : विमानतळावर पोलिस बॅंडची धून... फुलांचा वर्षाव.. देशभक्तिपर गीतांनी भारलेले वातावरण... दमाणी अंध शाळेच्या विद्यार्थ्यांच्या लेझीम अन् ढोल पथकाचा निनाद...उघड्या कारमधून विश्वविजेत्या भारतीय संघाची उपकर्णधार व सोलापूरची लाडकी लेक गंगा कदम हिची मिरवणुकीने प्रत्येक सोलापूरकरांची मान उंचावली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com