सोलापूर : बांधकामाच्या क्षेत्रात गो क्रांती ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर : बांधकामाच्या क्षेत्रात गो क्रांती !

सोलापूर : बांधकामाच्या क्षेत्रात गो क्रांती !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : बांधकाम क्षेत्रात गोउत्पादनांपासून तयार केलेले वैदिक प्लास्टर, विटानंतर आता वैदिक पेंटची निर्मिती झाली आहे. या साहित्य निर्मितीमुळे बांधकाम क्षेत्रात कमी खर्चाचे, नैसर्गिक व उष्णतारोधक गुण असलेली उत्पादने उपलब्ध झाली आहेत.

बांधकामाच्या क्षेत्रात यापूर्वी गोउत्पादनांचा उपयोग फारसा केला जात नव्हता. परंतु पारंपरिक मातीच्या घराच्या बांधकामात शेणाचे सारवण केले जायचे. आधुनिक सिमेंट बांधकामात त्याचा उपयोग यापूर्वी होत नव्हता. आता वैदिक प्लास्टरचा उपयोग केला जाऊ लागला आहे. विशेष म्हणजे या प्रकारच्या प्लास्टरला वाळूची गरज भासत नाही. याप्रकारच्या प्लास्टरचा खर्च सध्याच्या सिमेंट प्लास्टरच्या खर्चाच्या तुलनेत कमी आहे. या प्रकारचे प्लास्टर हे उष्णतारोधक असल्याने खोलीचे तपमान कमी करते. अधिक उष्णतेच्या भागात हे प्लास्टर परिणामकारक ठरते.

गायीच्या शेणापासून विटाचे उत्पादनदेखील केले जात आहे. सध्या इतर राज्यातून या प्रकारच्या विटा उपलब्ध होतात. याही विटा वजनाने हलक्‍या आहेत. पण त्या उष्णतारोधक आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या मातीच्या विटाच्या तुलनेत थोड्या महाग असल्या तरी नैसर्गिक परिणाम दर्शवणाऱ्या आहेत. या विटाचे उत्पादन स्थानिक गोशाळांतून केले जावे असा प्रयत्न केला जात आहे. जेणे करून या गोशाळांना एक चांगला उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होणार आहे. त्यापाठोपाठ घराला देण्यासाठी वैदिक रंग उपलब्ध झाले आहेत. सध्या वापरात असलेले रंग हे रसायनापासून तयार केले जातात. याप्रकारची रसायने आरोग्यदृष्ट्या घातक असल्याने त्याला वैदिक रंगाचा नैसर्गिक पर्याय उपलब्ध झाला आहे.

हेही वाचा: "मी पुन्हा येतेय, काहीतरी तुफानी करुयात"; अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट

गोधन विशेषांकाची प्रेरणा

गोउत्पादनांपासून बनवलेले बांधकाम साहित्यसेवा देणारे ऋषिकेश दिंडोरे यांनी दैनिक सकाळच्या गोधन विशेषांकाची प्रेरणा घेऊन वैदिक पेंटचा उद्योग सुरु केला आहे. या प्रकारचे रंग हे नैसर्गिक असल्याने ते आरोग्यास हानीकारक नाहीत. तसचे ते उष्णतारोधक असल्याने घराचे आतील तपमान थंड ठेवण्यास मदत करतात.

ठळक बाबी

  • वैदिक प्लास्टरला वाळूची आवश्‍यक्ता नाही

  • सिमेंट प्लास्टरच्या खर्चापेक्षा वैदिक प्लास्टरचा खर्च कमी

  • गोउत्पादनापासून विट निर्मितीचे प्रयत्न

  • उष्णतारोधक व तपमान कमी ठेवणारी उत्पादने

"मला घरात अग्निहोत्राचे संस्कार मिळाले. माझा व्यवसाय स्थीर असला तरी गोसेवा म्हणून काही करायला हवे याचा शोध घेताना या बांधकाम साहित्याची सेवा उपलब्ध करून देत आहे."

- प्रशांत महाडिक, गो-साहित्य विक्रेता, सोलापूर

"सातत्याने बांधकाम क्षेत्रात गो-उत्पादने वाढत आहेत. स्थानिक गोशाळांनी याप्रकारची उत्पादने केली तर आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत याकामी करणार आहोत. गोशाळांना आर्थिक उत्पन्न वाढावे असा त्यामागे उद्देश आहे."

- ऋषिकेश दिंडोरे, गो-साहित्य विक्रेता, सोलापूर

loading image
go to top