Solapur : एक पणती वंचितांच्या दारी!

आपुलकीच्या फराळाने वंचितांची दिवाळी झाली गोड..!
Solapur news
Solapur newsesakal

सांगोला : एक पणती वंचितांच्या दारी या उपक्रमांतर्गत सांगोला येथील आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने शहराच्या लगत पालं टाकून राहणाऱ्या वंचितांना दिवाळीचा फराळ, सर्व लहान मुलांना नवे कपडे व इतर साहित्य देऊन या वंचितांची दिवाळी गोड करण्यात आली.दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या पूर्वसंध्येला आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य व देणगीदारांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला.

Solapur news
Solapur : मोहोळच्या प्रथम नगराध्यक्षांनी कामगारांना वाटली एक टन साखर

सांगोला शहरातील वासुद रोड, मिरज रोड, स्मशानभूमी आदी भागात विविध छोट्या व्यवसायानिमित्त पालं टाकून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या या वंचितांची दिवाळी साजरी करण्यासाठी आपुलकी प्रतिष्ठान गेल्या तीन वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे.

Solapur news
Solapur : राजकारणात पुन्हा उलतापालतीची शक्यता ?

वंचितांच्या पालावर जाऊन लहान मुलांना कपडे, महिला भगिनींना भाऊबीज भेट म्हणून साड्या व प्रत्येक कुटुंबाला दिवाळीचा फराळ, पणती, सुगंधी उटणे, साबण, सुगंधी तेल आदी साहित्य देऊन या वंचितांची दिवाळी गोड करण्याचा छोटासा प्रयत्न दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात आला.

Solapur news
Solapur : शिंदे-फडणवीस सरकारच्या वतीने गावोगावी दिवाळीपुर्वी आनंदाचा शिधा पोहच

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, सहसचिव शरणप्पा हळळीसागर, डॉ. मच्छिंद्र सोनलकर, अरविंद केदार, प्रमोद दौंडे, सुरेशकाका चौगुले, अरविंद डोंबे, अच्युत फुले, वसंत सुपेकर, अमेय मस्के, भारत कदम, श्रवण महिमकर उपस्थित होते.

Solapur news
Solapur : टोमॅटोचा लाल चिखल, कांद्याचा रेंदा

समाजातील प्रत्येक गरजू घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आपुलकी प्रतिष्ठान नेहमीच प्रयत्नशील असते. सदर उपक्रमाचा सर्वे दिवाळीपूर्वी आठ दिवस आधी करण्यात आला. प्रत्येक कुटुंबाची माहिती घेऊन लहान मुलांना कपडे, त्याचबरोबर सर्व भगिनींना भाऊबीज भेट म्हणून साडी देण्याचा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. तो यापुढेही सर्वांच्या सहकार्यातून चालू राहिल.

- राजेंद्र यादव अध्यक्ष, आपुलकी प्रतिष्ठान, सांगोला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com