विधानपरिषद निवडणुकीत सोलापूरला वगळले; जगतापांनी दाखल केली 'जनहित'! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अजित जगताप

याची माहिती जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप यांनी दिली.

विधानपरिषद निवडणुकीत सोलापूरला वगळले; जगतापांनी दाखल केली 'जनहित'!

मंगळवेढा (सोलापूर): राज्य निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या रिक्त जागेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी सोलापूर विधानपरिषदेची निवडणूक वगळल्याने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय झाली. याची माहिती जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप यांनी दिली.

हेही वाचा: मंगळवेढा राष्ट्रवादीत पदाधिकारी निवडीवरून धुसफूस! निवड वादात

यासंदर्भात जिल्ह्यातील नगरपालिकेतील नगरसेवकांची बैठक घेऊन त्यावर निर्णय घेतला असून या निवडणुकीसाठी 495 मतदार असून संख्येतील 85 मतदार रिक्त आहे. सध्या 410 मतदार पात्र असून पात्र टक्केवारी मतदार 82 टक्के असताना अपुऱ्या महितीच्या आधारे निवडणूक आयोगाला सोलापूर येथील निवडणूक कार्यालयाकडून चुकीची माहिती सादर करण्यात आली. यामुळे अपेक्षित मतदार संख्या नसल्याचे दाखवण्यात आल्याने जिल्ह्यातील विधानपरिषद जागेची निवडणूक वगळून राज्यातील सर्व निवडणूक घेण्याचे निश्चित केले.

हेही वाचा: मंगळवेढा उपसासिंचन योजनेच्या दोन टीएमसी पाण्यास शासनाची मंजुरी

यामुळे डिसेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या नगरसेवकांना या निवडणुकीला भविष्यात मतदान करता येणार नाही, म्हणून या नगरसेवक आतून निवडणूक आयोगाच्या निर्णयाबद्दल नाराजी पसरली. भाजप आ. प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादी चे बहुमत असताना देखील अर्थपूर्ण ताकदीच्या जोरावर त्यांनी विधान परिषद ताब्यात घेतली. यंदा भाजपाचे मतदार मोठ्या प्रमाणात असताना जवळपास त्यांची उमेदवारी भाजप नेत्यांनी निश्चित केली. अशा परिस्थितीत त्यांना तगडे आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीने चाचपणी सुरू केली असली तरी अद्याप उमेदवार निश्चित केला नाही. परंतु निवडणूक आयोगाच्या घोषणेमुळे या निवडणुकीसाठी पात्र असणाऱ्या अनेक मतदारांचे मोठे उत्पन्न बुडणार असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली.

या बैठकीत शंभर पेक्षा अधिक पालिकेचे नगराध्यक्ष व नगरसेवक उपस्थित होते. चर्चेनंतर निवडणूक अधिकारी यांच्या निर्णया विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.

- अजित जगताप, सदस्य नियोजन मंडळ

loading image
go to top