Solapur : रोज विक्रमी १६० सूर्यनमस्कार ! झाल्या गंभीर आजारापासून मुक्त,कसे ते घ्या जाणून

दररोज १० ते १५ गोळ्या त्या घेत होत्या. या गोळ्याचे साईड इफेक्ट देखील गंभीर असल्याने त्यांच्या अडचणी वाढत होत्या. त्यातूनच त्यांना लठ्ठपणा आला. त्यानंतर त्यांना रक्तदाबाचा त्रास सुरु झाला. रक्तदाबाच्या गोळ्या देखील त्या घेऊ लागल्या. त्यांचे उपचार सुरु झाले. लठ्ठपणाने त्यांना इतर आजारात अडकवले होते.
solapur
solapursakal

सोलापूर - येथील प्रा.डॉ.अमिता जावळे यांनी दररोज १६० सूर्यनमस्कार घालत तब्बल तीन आजारापासून स्वतःला मुक्त करून आपले आरोग्य निरोगी बनविले आहे.

विशेष म्हणजे सर्वाधिक सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम त्यांनी स्वत:च्या नावावर नोंदविला आहे. विक्रमी सूर्यनमस्कार घालणाऱ्या बहाद्दर हिरकणीने जीवघेण्या आजारांवर मात केली आहे.

प्रा.डॉ. काही वर्षापूर्वी त्यांना थॉयरॉईडचा आणि सायटीका आजाराचा त्रास सुरु झाला. या आजारात विशिष्ट नस दबून प्रचंड वेदना होतात. या वेदनांनी त्या त्रस्त झाल्या होत्या. त्यावर रामबाण उपाय नसल्याने केवळ वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागत होत्या.

solapur
Mumbai : कल्याण मध्ये दिवसाढवळ्या केडीएमसीचे पाण्याचे पाईप चोरण्याचा प्रयत्न; नागरीकांच्या सतर्कतेमुळे ही चोरी उघडकीस

दररोज १० ते १५ गोळ्या त्या घेत होत्या. या गोळ्याचे साईड इफेक्ट देखील गंभीर असल्याने त्यांच्या अडचणी वाढत होत्या. त्यातूनच त्यांना लठ्ठपणा आला. त्यानंतर त्यांना रक्तदाबाचा त्रास सुरु झाला. रक्तदाबाच्या गोळ्या देखील त्या घेऊ लागल्या. त्यांचे उपचार सुरु झाले. लठ्ठपणाने त्यांना इतर आजारात अडकवले होते.

या दरम्यान प्रा.डॉ. जावळेंना योगाची काही माहिती पूर्वीपासून होती. त्यातच कोरोनाची साथ सुरु झाल्याने त्यांच्या संकटात भर पडली.

त्यांनी सुरवातीला सोशल मीडियावर योगासने व सूर्यनमस्काराचे धडे शिकण्यास सुरवात केली. तेव्हा इस्लामपूरच्या राजश्री जाधव-पाटील यांनी त्यांना त्यांच्या सूर्यनमस्कार ग्रुपमध्ये घेतले. या ग्रुपमध्ये रोजच्या सूर्यनमस्काराची नोंद करण्याचीफॅक्ट होती.

solapur
Pune : अवघ्या दोन वर्षांच्या शौर्यची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद!

प्रा.डॉ. जावळे यांचे सूर्यनमस्कार नियमित सुरु झाले. त्यांनी इतर योगासने युट्यूबवर शिकण्यास सुरवात केली. त्यांचा रोजचा सराव ३० सूर्यनमस्कारावर गेल्यावर त्यांच्या ‘सायटिका’ आजाराच्या गोळ्या बंद झाल्या. प्राणायाम, कपालभाती आदीच्या परिणामातून त्यांची रक्तदाबाची गोळी देखील थांबली.

त्यांनी त्यांचे सूर्यनमस्कार १०८ पर्यंत वाढवत नेले. तेव्हा त्यांचे वजन व थॉयरॉईडच्या आजाराने उतार धरला. कोरोना संसर्गात त्यांना व्यायामाचा लाभ झाला. आजही त्या दररोज विक्रमी म्हणजे १६० सूर्यनमस्कार घालतात. आता त्या सर्व आजारातून मुक्त आहेत.

ठळक बाबी

  • रोजचे एकूण सूर्यनमस्कार १६०

  • सायटिका, रक्तदाब व थायरॉईड आजारापासून मुक्तता

  • वजन ७४ वरून ५८ किलोपर्यंत केले कमी

  • आसने, प्राणायामाचा प्रभावी उपयोग

  • सूर्यनमस्काराबरोबरच योगासने , प्राणायाम, वॉकिंग

  • आठवड्यातून एक दिवस २०० सूर्यनमस्काराचा नियम

solapur
Mumbai Electric Water Taxi : दिवाळीत सुरु होणार इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी,मुंबईकर करणार स्वस्त प्रदूषण मुक्त जल प्रवास

आहाराचा पॅटर्न

या व्यायामाला आहाराची जोड देताना त्यांनी साखर व साखरेचे पदार्थ खाणे बंद केले. घरात खाद्यतेलाचा वापर निम्म्यावर आणला. रोज एक ऋतूफळ, एक ग्लास गाईचे दूध त्या घेतात. तसेच नऊ धान्याचा वापर स्वयंपाकात करतात. तसेच हिरव्या पालेभाज्यांचा वापर केला. बाहेरचे खाणे पूर्णपणे बंद केले.

आजारातून सुटका करताना निरोगी जीवनाचा मूलमंत्र सूर्यनमस्कारातून सापडला. त्या आसने व प्राणायामची जोड देत आरोग्यदायी जीवनशैली माझ्यासाठी व कुटुंबासाठी स्वीकारली. त्यामुळे एक परिवर्तन आयुष्यात घडले.

-प्रा. डॉ. अमिता जावळे, दमाणीनगर, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com